उमरगा :- तालुक्यातील नारंगवाडीत प्रभू श्रीराम नवमी निमित्त येथे भव्य गावाईज नारंगवाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत ३२ संघाने यात सहभाग नोंदवला आहे.
उदघाटन नारंगवाडीचे सरपंच शेखर घंटे,पोलीस पाटील हेमंतराव पाटील,किशोर सांगवे,जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस गणेश पवार,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष हनुमंत सांगवे,भाजपा तालुकासरचिटणिस विठ्ठल चिकुंद्रे,व्यापारी मंडळाचे अध्यक्ष खंडू पवार,पांडुरंग पवार,तंटामुक्ती अध्यक्ष आकाश पवार,तुकाराम चव्हाण,मुस्तफा चौधरी,विशाल राजपूत,राजेश घंटे,राहुल देशमुख आयोजक अमोल पवार,शंकर पांचाळ, रणजित दादा चिकुंद्रे,शाम पवार,सदाशिव आष्टे,राज राजपूत,संतोष गरड, आदित्य राजपुत,आदी ग्रामस्थ खेळाडू उपस्थित होते.