उमरगा :- तालुक्यातील पेठ सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दि. 21 मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .संतोष पाटील होते तर उद्घाटक म्हणून लोहारा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक.ज्ञानेश्वर कुकलारे लाभले होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी .काकासाहेब साळुंके, केंद्रप्रमुख .अशोक सुतार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष.श्रीमंत सुरवसे, पोलिस पाटील,.ईश्वर सुरवसे, सोसायटी चेअरमन .हरिभाऊ भोसले,व्हा.चेअरमन महादेव घोडके व राजेंद्र शरणाप्पा पाटील यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी मान्यवर कुकलारे , काकासाहेब साळुंके साहेब,सुतार साहेब, श्रीमंत सुरवसे, ईश्वर सुरवसे, हरिभाऊ भोसले, महादेव घोडके, ग्रामपंचायत सदस्य गिरमल दलाल,संजय माळी, पत्रकार लक्ष्मण कांबळे, लाईनमन तानाजी सुभेदार, पोलिस कोळी साहेब,सास्तुरे साहेब,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष उमेश सुरवसे, शिक्षणतज्ज्ञ संजय पाटील, सदस्य अहमद तांबोळी, रामचंद्र सुरवसे,अमर यमगर, निळकंठ राठोड,बंडू राठोड,नाजम पठाण, विठ्ठल सुरवसे, प्रभावती सुरवसे,स्मिता पाटील,शामल मुसांडे,पार्वती कांबळे, कोरिओग्राफर गाडेकर, राजपूत, व्हिडिओ ग्राफर,शिक्षकमित्र गायकवाड ,आगंबरे ,,भुसार ,मुख्याध्यापिका गुंजोटे व शाळेच्या माजी शिक्षिका झिंगाडे यांचा शाळा व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यानंतर कुकलारे साहेब व तं.मु.अ.श्रीमंत सुरवसे यांनी मनोगत व्यक्त करुन सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षण, संविधान, देशभक्ती,संस्कृती, समाजप्रबोधन,अध्यात्म,कला व मनोरंजन अशा विविध विषयांवर गाणी, नृत्य,नाटिका, भारुड व विनोदी चुटकुले अशा वेगवेगळ्या परफॉर्मन्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमुर्ती स्वामी यांनी केले तर आभार प्रदर्शन मु.अ.कल्पना गुंजोटे यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक चौधरी ,स्वामी ,भंडारे ,साखरे , शिक्षिका साळुंके , गायकवाड ,गोबाडे ,आळणे ,सुरवसे , पाटील , मुख्याध्यापिका गुंजोटे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
Home आरोग्य व शिक्षण पेठ सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचा...