उमरगा:- येथील श्री छत्रपती शिवाजी महाविलयातील रसायनशास्ञ विभागाच्या सशोधन केद्राचे संशोधक विद्यार्थी श्री सचिन शिवाजी गरड यांना नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नुकतीच रसायनशास्त्र विषयांमध्ये पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांनी “न्यू ऍनालिटिकल मेथड डेव्हलपमेंट ऍड व्हॅलिडेशन फॉर ऍक्टिव्ह फार्मासिटिकल इन्ग्रेडिएंट्स अँड रिलेटेड कंपाउंडस यूज्ड एज अँटी इम्प्लिमेंटरी,अँटी डायबेटिक अँड अँटी हायपरटेनसीव ड्रग्स” या विषयावर शोध निबंध विद्यापीठाला सादर केला होता. बाह्य परिक्षक म्हणून प्रा. रविद्र तिवारी, बनारस केन्द्रिय विद्यापीठ, वाराणशी व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्रा.सागर डेलेकर यांनी परिक्षण केले. श्री गरड यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळेत सहभाग नोंदविला आहे. त्यांचे 5 संशोधन लेख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी याच विषयात एक भारतीय पेटंट देखील मिळवले आहे. शोधनिबंधासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक प्रा. डॉ. धनंजय माने यांचे मार्गदर्शन मिळाले. सध्या मेहता एपीआय या फार्मासिटिकल कंपनीमध्ये संशोधन विभागात असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या आणि या यशाला गवसणी घालणाऱ्या डॉ. सचिन गरड व त्यांचे मार्गदर्शक प्रा. डॉ. धनंजय माने सर यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे विभाग प्रमुख डॉ. व्ही एस सूर्यवंशी आदीनी केले आहे.