लोहारा.:- तालुक्यातील शेतकऱ्यांना शहरातील भारत माता मंदिर येथे दि. 27 रोजी रुपेश पवार सामाजिक संस्था अँड. प्रा.लि. नाशिक) यांच्यावतीने बोअर, विहीर, सोलर विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन उंडरगाव येथील बबनजी महाराज यांनी केले होते. यावेळी सामाजिक संस्थेचे रुपेश पवार (नाशिक) यांनी शेतकऱ्यांना किती दिवसांत सोलर बसवून मिळेल, याचा फायदा, अशी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमास उंडरगाव, कार्ला, हिप्परगा(रवा), माकणी, नांदुर्गा, अदि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.