सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांची आ.अभिमन्यु पवार यांनी भेट घेऊन औसा मतदारसंघातील रस्ते विकासकामांचा पाठपुरावा 

0
109

लोहारा :-  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांची आ. अभिमन्यु पवार यांनी भेट घेतली. लामजना ते निलंगा (0/0 ते 18/200), निलंगा – लिंबाळा – हरिजवळगा – तुरोरी (44/400 ते 83/300) व धाराशिव जिल्हा सरहद्द – मुदगडवाडी – मुदगड रामलिंग – कासार सिरसी – शिराढोण – मिरगन्हाळी – ममदापूर – तांबाळा – कर्नाटक सरहद्द (55/400 ते 84/200) या रस्त्यांच्या उरलेल्या लांबीच्या सुधारणा कामांसाठी हायब्रीड अन्यूईटी मॉडेल (HAM) अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा तसेच आलमला – औसा – नागरसोगा रस्त्यावर औसा शहराजवळ पूल बांधणे, हसलगन – संक्राळ – पोमादेवी जवळगा – लामजना रस्त्यावर पोमादेवी जवळगा गावाजवळ पूल बांधणे, बेलकुंड – देवताळा – लोहटा – माकणी रस्त्यावर तेरणा नदीवर पूल बांधणे व एकंबी – चिंचोली काजळे – हिप्परगा – नागरसोगा लामजना रस्त्यावर तेरणा नदीवर पूल बांधणे साठी केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत 35 कोटी रु. निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती आ.अभिमन्यु पवार यांनी केली. यासोबतच राममा 361 ते नागरसोगा गाव रस्ता, रामा 238 – हसलगन – संक्राळ – पोमादेवी जवळगा – लामजना – राममा 548B – प्रजिमा 53 (3/00 ते 10/500) रस्ता, एकंबी – उजनी – राममा 361 – प्रजिमा 55 (5/00 ते 10/00) रस्ता, राममा 548B – कारला – कुमठा – नणंद (5/00 ते 12/500) रस्ता, राममा 361 – बुधोडा – सेलू – हासेगाववाडी – पानचिंचोली (32/500 ते 35/७०० आणि 37/400 ते 49/00) रस्ता आणि लिंबाळा – बाणेगाव – किल्लारी – मंगरूळ – जिल्हा सीमा (10/00 ते 14/00) रस्ता या रस्त्यांचे सुधारणा काम करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत 70 कोटी रु. निधी उपलब्ध करून द्यावा अशीही विनंती त्यांना केली. आगामी काळात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत औसा मतदारसंघातील प्रस्तावित रस्ते सुधारणा कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध होईल असा विश्वास आ.अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here